Hindu Garjana Chashak | ‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस आज शानदार प्रारंभ !

पुणे : Hindu Garjana Chashak | हिंदू गर्जना प्रतिष्ठान (Hindu Garjana Pratishthan) आणि पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group-PBG) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस आज प्रारंभ झाला. स्पर्धेत पुण्यासह पिंपरी, चिंचवड, बारामती, मावळ, हवेली, शिरूर, मुळशी, इंदापुर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हे या वेगवेगळ्या जिल्ह्यातून कुस्तीपटू सहभागी झाले आहे.
शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या या मान्यतेने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पर्धेत १४ वर्षाखालील कुमार गटामध्ये २७४ खेळाडू, १७ वर्षाखालील गटामध्ये १९९, वरिष्ठ गटामध्ये १९८, महिला गटात ६०, कुमार खुला गटामध्ये ३५, वरिष्ठ खुल्या गटामध्ये ७६ आणि महिला खुल्या गटामध्ये २७ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.
टिळक रोड येथील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर आज सकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेत १४ वर्षाखालील कुमार गटाच्या लढती घेण्यात आल्या. मध्यभागी कुस्तीचे आखाडे आणि प्रेक्षक गॅलरी असे भव्य कुस्ती स्टेडियमची निमिर्ती या स्पर्धेसाठी केली गेली आहे. मैदानावर मातीचे दोन स्वतंत्र आखाडे तयार करण्यात आले असून आखाड्यांच्या बाजुने क्रीडारसिकांची १० हजार प्रेक्षकांची बसण्याची सोय केली आहे. तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी येणार्या पुरूष आणि महिला पैलवानांसाठी राहण्याची आणि भोजनाची सोय करण्यात आल्याचे पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan) आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे (Dheeraj Ghate) यांनी सांगितले.
संध्याकाळच्या सत्रामध्ये (संध्याकाळी ६ वाजता) स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ता मामा भरणे हे उपस्थित राहणार आहेत. (Hindu Garjana Chashak)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा