Dattatray Alias Aba Kale | पैलवान दत्तात्रय उर्फ आबा काळे राजकीय आखाड्यात, राष्ट्रवादी पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड

पुणे: Dattatray Alias Aba Kale | कुस्ती क्षेत्रातील नामांकित पैलवान दत्तात्रय उर्फ आबा पांडुरंग काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे निवडीचे पत्र काळे यांना दिले आहे.
दरम्यान या नियुक्तीबाबत बोलताना दत्तात्रय उर्फ आबा काळे म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रांत अध्यक्ष सुनिल तटकरे, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची सर्व ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पक्षाची विचारधारा तसेच पक्षाने राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून ‘गाव तिथे राष्ट्रवादी काँग्रेस’ ही संकल्पना नव्याने राबवणार आहोत. आगामी काळात जास्तीत जास्त युवकांना पक्षात संधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही काळे यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा