Sanjay Raut Critisice Sharad Pawar | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याने संजय राऊतांचा संताप, म्हणाले ”कोण कोणाला टोप्या घातलंय आणि…”

मुंबई : Sanjay Raut Critisice Sharad Pawar | महाराष्ट्राचे राजकारण फार विचित्र दिशेने चालले आहे. कोण कोणाला टोप्या घालतंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागेल. ज्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली, शिवसेना फोडली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते, ही आमची भावना आहे, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवारांवर संताप व्यक्त केला आहे.
काल दिल्लीतील एका सोहळ्यात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यावरून आता महाराष्ट्रात राजकीय धुसफूस सुरू झाली असून संजय राऊत यांनी आपली नाराजी आज उघडपणे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
संजय राऊत म्हणाले, ज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोण-कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांचा सन्मान आपल्या हातून करणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभीमानाला धक्का आहे. कदाचित पवारांची भावना वेगळी असेल. पण हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेले नाही. कारण शरद पवारांचा आम्ही आदर करतो.
संजय राऊत म्हणाले, ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीतील राजकारण वेगळे असेल, पण यामुळे आम्हाला वेदना झाल्या. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचे आणि अजित पवारांचे गुफ्तगु होत असेल, पण याचे भान राखून आम्ही पुढचे पाऊल टाकतो.
संजय राऊत पुढे म्हणाले, दिल्लीत साहित्य संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली सुरू आहे. कोणालाही कसेही पुरस्कार देतात. या लोकांचा साहित्याशी संबंध काय? माझा आयोगाला प्रश्न आहे की तुम्ही दिल्लीत दलाली करायला गेलात का? ही साहित्याची सेवा आहे का? भाजपाचा हा उपद्व्याप आहे.
मराठीची काय सेवा केली तुम्ही? महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणार्यांचा सत्कार करता तुम्ही?
हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतील दलाली आहे. मलाही याचे आमंत्रण असून मी येथे जाणार नाही.
जो मराठी माणूस आहे, तो जाणार नाही,
अशी नाराजी संजय राऊत यांनी व्यक्त केली. (Sanjay Raut Critisice Sharad Pawar)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा