Pune Crime News | पुणे : सासूकडून सून आणि नातवाचा छळ

crime-logo

पुणे : Pune Crime News | नुकतेच आजीने आपल्या नातवंडांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचे असामान्य प्रकरण समोर आले आहे. डोंगरगाव गावात असलेला गेट क्रमांक 375 हा डॉ. गुलाब बंब यांच्या मालकीचा होता. ज्यांनी 15.1.2007 रोजी त्यांच्या मुलाच्या उपस्थितीत मृत्युपत्र तयार केले आणि त्यावर स्वाक्षरीकेली आणि इतर दोन साक्षीदारांनी साक्ष देण्याचे शपथपत्र दिले. त्या मृत्युपत्रानुसार, ऋषभ तालेरा आणि वर्धन तालेरा यांना मालमत्ता दिलेहोते. शिवाय, त्यांच्या धाकट्या मुलाने त्याची वैद्यकीय तपासणी करून फिटनेस ऑफ माइंड सर्टिफिकेट दिले होते आणि वडील डॉ. गुलाब यांनीत्यांच्या उपस्थितीत मृत्युपत्रावर स्वाक्षरी केल्याची पुष्टी केली होती.

त्यानंतर, एक्झिक्युटर, जो डॉ. बंब यांचा मोठा मुलगा होता, त्याने वर्ष 2009 मध्ये सब रजिस्ट्रार हवेली 2 यांच्यासमोर मृत्युपत्राची नोंदणी केली, त्या वेळी ऋषभ तालेरा हा 11 वर्षांचा अल्पवयीनअसल्याने त्याने बनावट इच्छापत्र तयार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हिंदू कायद्यानुसार, डॉ. बंब यांचे कायदेशीर वारस त्यांचे 2 मुले, विधवा आणिमुलगी आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, डॉ. बंब यांच्या कायदेशीर वारसांपैकी कोणीही मृत्युपत्राला आक्षेप दिलेले नाही, त्याऐवजी ते ऋषभ आणिवर्धन यांना दिलेल्या मृत्युपत्राचे समर्थन करत आहेत. कायद्याच्या दृष्टीने, बहीण कायदेशीर वारस नाही आणि त्यामुळे मृत्यूपत्र नसतानाही तिला संपत्तीमिळवण्याचा अधिकार नाही, त्यामुळे मृत्यूपत्राला आक्षेप देण्याचा अधिकार नाही. मृत्युपत्राची माहिती १७ वर्षापासून असूनही सुमनदेवी यांनी पतीच्या मृत्यूनंतर हेविल बनावट असल्याचा आरोप करत लोणीकंद पोलीस ठाण्यात खोटी पोलीस तक्रार दाखल केली.

18.12.2023 रोजी, लोणीकंद पोलीसस्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टापरे यांनी सुमनदेवीची तक्रार बंद केली त्यांच्या स्वतंत्र चौकशीत हे मृत्यूपत्र खरे असल्याचे आणि डॉ. बंबयांनीच बनवलेले असल्याचे आढळून आले. पहिली तक्रार बंद केल्यानंतर, सुमनदेवी यांनी दुसरी तक्रार दाखल केली जी 8 एप्रिल 2024 रोजी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्री. करे यांनी बंद केली होती. या दुसऱ्या तक्रारीच्या चौकशीदरम्यान, डॉ. बंब यांच्या दोघी मुलांनीही जबाब दिला की डॉ. बंब यांनी स्वाक्षरी केलेले मृत्युपत्र खरे हे आणि सुमनदेवी यांचे पती श्री. चंदुलाल तालेरा यांना मृत्यूपत्राची माहिती होती आणि त्यांनी त्यांना नोंदणी करण्यास सांगितले. ऋषभच्या म्हणण्यानुसार, त्याचे आजोबा चंदुलालजी तालेरा यांच्या निधनानंतर, त्यांची सुमनदेवी त्यांची आई सोना तालेरा यांना तिच्या स्त्रीधनच्या बेकायदेशीर मागणीसाठी त्रास देण्यासाठी आणि तिच्या सून आणि नातवंडांच्या मालकीची मालमत्ता हडपण्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करत आहे.

22.1.25 च्या आदेशानुसार डोंगरगाव जमिनीवर ऋषभ तालेरा यांचे नाव फेरफार करण्याचे आदेश पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यांना दिले आहेत त्यामुळे मृत्युपत्र खरे आहे. डोंगरगाव येथील गट क्रमांक ३७५ बाबतचा विषय विशेष दिवाणी वाद क्रमांक १५९/२०२४ मध्ये न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे, सदर जमिनीसंबंधीची तक्रार पोलीस तक्रार प्राधिकरणासमोर देखील ग्राह्य धरता येणार नाही.

पोलीसनामा मध्ये ११ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रकाशित झालेल्या बातमीबाबत आणि सुमन देवी तलेरा यांनी पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे दिलेल्या तक्रारीच्या संदर्भात, ऋषभ तलेरा यांनी आपले स्पष्टीकरण देत सुमन देवी तलेरा यांचे आरोप फेटाळले आहेत.

ऋषभ तलेरा यांच्या म्हणण्यानुसार, वडगावशेरी येथील प्लॉट क्रमांक ५५, ५६ आणि ६९ या जमिनीवर सुमन देवी तलेरा यांचा कोणताही कायदेशीर हक्क नाही. सदर जमीन मूळतः १९७४ साली सुषिला देवी एस. तलेरा यांनी गणू मुर्कुटे यांच्याकडून नोंदणीकृत विक्रीपत्राद्वारे खरेदी केली होती. त्यानंतरपासून सर्व महसुली नोंदींमध्ये ही जमीन सुषिला देवी तलेरा यांच्या नावावरच आहे.

१९९२ साली, सोना तलेरा यांच्या वडिलांनी सुषिला देवी तलेरा यांना ₹७५,००० दिले आणि त्या बदल्यात त्यांनी ही जमीन सोना तलेरा यांना विक्रीस मान्यता दिली. पुढे, २०२४ साली सोना तलेरा आणि सुषिला देवी तलेरा यांनी सदर जमीन अग्नी रियाल्टर्स यांना विक्री केली. त्यामुळे, सुमन देवी तलेरा यांना या जमिनीवर कोणताही हक्क, स्वामित्व किंवा संबंध नाही, असे ऋषभ तलेरा स्पष्ट करतात.

तसेच, ऋषभ तलेरा यांनी सांगितले की, सुमन देवी तलेरा यांनी पूर्वी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आणि त्यांच्या मुलगा सुभाष तलेरा यांच्यामार्फत धमक्या देत त्यांच्याकडून जमीन त्यांच्या नावे करण्यासाठी तसेच विक्रीच्या रकमेस त्यांच्या खात्यात वळवण्यासाठी दबाव टाकला. याविरोधात, ऋषभ तलेरा आणि सोना तलेरा यांनी मानवाधिकार आयोग, मुंबई येथे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे, पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे करण्यात आलेली सद्य तक्रार कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही, असे ते म्हणाले.

या प्रकरणाच्या हाताळणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ऋषभ तलेरा म्हणाले की, २०२२ पासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाला पोलीस तक्रार प्राधिकरणाने विशेष वेग दिला आणि तक्रारीला प्राधान्य देत तातडीने सुनावणी घेतली. तसेच, सुमन देवी तलेरा यांच्या विनंतीवरून हे प्रकरण चंदननगर पोलीस ठाणे आणि लोणीकंद पोलीस ठाण्याच्या चौकशीमधून काढून आर्थिक गुन्हे शाखा, पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आले.

मात्र, ऋषभ तलेरा यांच्या मते, या प्रकरणाची आतापर्यंत ४-५ वेळा चौकशी झाली असून प्रत्येक वेळी हे प्रकरण नागरिक कायद्याच्या (सिव्हिल) स्वरूपाचे असल्याचे निष्कर्ष निघाले आहेत. विशेष म्हणजे, १४ जून २०२४ रोजी चंदननगर पोलीस ठाण्याने सुमन देवी तलेरा यांना समन्स पाठवून त्यांच्याकडे जमिनीच्या हक्कासंबंधी पुरावे मागितले होते. परंतु, आजपर्यंत त्या कोणतेही पुरावे सादर करू शकलेल्या नाहीत, यावरून त्यांच्या तक्रारीत काहीही तथ्य नाही, असे स्पष्ट होते.

याशिवाय, ऋषभ तलेरा यांनी नमूद केले की, जेव्हा एखादे प्रकरण आधीपासून दुसऱ्या न्यायाधिकरणात प्रलंबित असेल, तेव्हा पोलीस तक्रार प्राधिकरणाला त्याची चौकशी करण्याचा कोणताही अधिकार नाही. या प्रकरणात, चंदननगरमधील वाद न्यायसंगत प्राधिकरण असलेल्या मानवाधिकार आयोगासमोर प्रलंबित आहे.

अशा परिस्थितीत, ऋषभ तलेरा यांनी सांगितले की, सुमन देवी तलेरा यांनी चुकीच्या मार्गाने कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करत अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी मागणी केली की, यापूर्वी झालेल्या चौकशीच्या निष्कर्षांप्रमाणे या प्रकरणाचा योग्य न्यायनिवाडा व्हावा. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | चांदीच्या दरात आज आश्चर्यकारक घसरण, जाणून घ्या काय आहे सोन्याचा दर,
दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे दर जाणून घ्या

Market Yard Pune Police News | छोट्याश्या खोलीत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग;
मार्केटयार्ड पोलिसांनी आंबेडकर नगरात कारवाई, 5 मोठे तर 12 छोटे गॅस सिलेंडर जप्त

Sanjay Raut Critisice Sharad Pawar | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याने संजय राऊतांचा संताप,
म्हणाले ”कोण कोणाला टोप्या घातलंय आणि…”

Pune Crime News | पुणे : सासूकडून सून आणि नातवाचा छळ

You may have missed