Pune Cyber Police News | पुणे सायबर पोलिसांकडून चोरीला गेलेले 456 मोबाईल परत, 6 पथके होती कार्यरत (Video)

Pune Cyber Police

पुणे : Pune Cyber Police News | मोबाईल हरविला, अकळत चोरीला गेला, गहाळ झाला असेल तर त्याची नोंद सी ई आय आर पोर्टलवरील तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी एका महिन्यात ४५६ मोबाईल परत मिळविले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना परत केले गेले. गेल्या महिन्यात शहरातून २३०० मोबाईल हरविले/चोरीला गेले होते. त्यापैकी सुरु असलेले व ट्रेस झालेले मोबाईल परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर मोबाईल परत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Mobile Theft Case)

https://www.instagram.com/reel/DGFV_65pGb7/?utm_source=ig_web_copy_link

लोकांचे हरविलेले, गहाळ झालेल्या मोबाईल फोनची तक्रार करण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या वेबसाईटवर लॉस्ट अँड फाऊंड हे पोर्टल उपलब्ध करुन देण्यात आले. यावर मिळणारा ऑनलाइन दाखला व नागरीकांचे स्वत:चे आधार कार्ड याद्वारे सी ई आय आर या केंद्रीय पोर्टलवर परत हरविलेल्या फोनबाबत तक्रार नागरीकांना नोंदवावी लागते. सी ई आय आर पोर्टलवर प्राप्त तक्रारीनुसार हरविलेल्या मोबाईल फोनचे आय एम ई आय क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करुन हरविलेल्या मोबाईलमध्ये सध्या सुरु असलेल्या सीमकार्डच्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेतले. ही सर्व माहिती ही पोलिसांना सी ई आय आर पोर्टलद्वारे प्राप्त होते.

गुन्हे शाखा, संगणक शाखा व सायबर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी सी ई आय आर पोर्टलवरील प्राप्त ट्रेस झालेल्या मोबाईल करीता संयुक्त ६ पथके तयार केली. पोर्टलवरील माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन गेल्या महिन्याभरात केलेल्या कारवाईमध्ये पुणे शहरातील २३०० हरविलेल्या मोबाईलच्या तक्रारीमधील एकूण ४५६ मोबाईल फोन सापडले आहेत. या पुढे देखील पुणे शहराबाहेर ट्रेस झालेले मोबाईलचे शोध कार्यक्रम सातत्याने चालू रहणार आहे.

शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील हिरकणी हॉलमध्ये एका कार्यक्रमात सापडलेले हे मोबाईल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, राहुल शिंदे, किरण जमदाडे, संदिप कोळगे, प्रमोद टिळेकर, विशाल इथापे, मनोज सांगळे, चेतन चव्हाण, नितीन जगदाळे, राजेंद्र पुणेकर, लटू सूर्यवंशी, समीर पिनाणे, इश्वर आंधळे, सुनयना मोरे, लोकेश्वर चुटके, किरण गायकवाड, सचिन शिंदे, कल्याणी कोळेकर, तसेच सुमषा तरंगे, दिनेश मरकड, अमर बनसोडे, आदनान शेख या सायबर पोलीस ठाणे, संगणक शाखा व गुन्हे शाखेकडील पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

मोबाईल फोन हरविल्यास किंवा गहाळ झाल्यास तात्काळ सी ई आय आर पोर्टलवर माहिती भरण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. (Pune Cyber Police News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | चांदीच्या दरात आज आश्चर्यकारक घसरण, जाणून घ्या काय आहे सोन्याचा दर,
दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे दर जाणून घ्या

Market Yard Pune Police News | छोट्याश्या खोलीत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग;
मार्केटयार्ड पोलिसांनी आंबेडकर नगरात कारवाई, 5 मोठे तर 12 छोटे गॅस सिलेंडर जप्त

Sanjay Raut Critisice Sharad Pawar | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याने संजय राऊतांचा संताप,
म्हणाले ”कोण कोणाला टोप्या घातलंय आणि…”

Pune Crime News | पुणे : सासूकडून सून आणि नातवाचा छळ

You may have missed