Yerawada Pune Crime News | पुणे : जेलमधून सुटल्यानंतर येरवडा परिसरात रॅली काढून दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगार गुड्ड्या कसबेवर MPDA अंतर्गत कारवाई; नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध

Guddya Kasbe

पुणे : Yerawada Pune Crime News | जेलमधून सुटल्यानंतर येरवडा परिसरात रॅली काढून दहशत पसरविणाऱ्या, गंभीर दुखापती करणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, असे गंभीर गुन्हे करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन त्याची नागपूर कारागृहात एक वर्षासाठी रवानगी केली आहे. प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या गणेश कसबे Praful alias Guddya Ganesh Kasbe (वय २३, रा. भिमज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. (Pune Police MPDA Action)

प्रफुल्ल कसबे याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तरी देखील तो त्या न जुमानता शहरात येत होता. त्यांच्याविरुद्ध नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे, गंभीर दुखापती करणे, प्राणघातक शस्त्रे बाळगणे असे ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या आदेशाने येरवडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याची पडताळणी करुन एक वर्षासाठी कसबे याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार १९ फेब्रुवारी रोजी त्याला ताब्यात घेऊन नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, स्वाती खेडकर, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, पोलीस हवालदार सचिन माळी, सचिन शिंदे, पोलीस अंमलदार विशाल मगदुम, मोनिका पवार यांनी केली आहे. (Yerawada Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed