Balbharati To Paud Phata Road Project | बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाने दिली परवानगी; पर्यावरणवाद्यांनी केला होता विरोध

Balbharati To Paud Phata Road

पुणे : Balbharati To Paud Phata Road Project | वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा प्रस्तावित असलेल्या रस्त्याच्या कामाला विरोध करणारी याचिकेवर उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा निर्णय दिला आहे. हा रस्ता करताना महापालिकेने योग्य प्रक्रियेचा अवलंब केला आहे. त्यामुळे नागरी चेतना मंचाची याचिका फेटाळून लावत या कामावरील स्थगिती उठविण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या आदेशामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. या कामाला स्थगिती दिल्याने गेल्या दीड वर्षापासून प्रक्रिया ठप्प झाली होती.

पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात कोथरूड (Kothrud) आणि सेनापती बापट रस्त्याला (SB Road Pune) जोडण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून बालभारती ते पौड फाटा रस्ता दाखविण्यात आला आहे. हा रस्ता बालभारती येथून वेताळ टेकडीवरून सुरु होऊन विधी महाविद्यालयाच्या पाठीमागून जाऊन केळेवाडी येथे पौड फाट्याजवळ संपतो. महापालिकेने या कामाचा प्रकल्प आराखडा तयार केला असून, त्यासाठी २५२ कोटी १३ लाख रुपये इतका खर्च होणार आहे.

दरम्यान हा रस्ता टेकडीवरून जाऊन येथील पर्यावरणाची हानी होणार असल्याने पर्यावरण प्रेमी नागरिक व संघटनांनी याला विरोध केला आहे. पाण्याचे झरे आटतील, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार, पुण्यातील टेकड्या, जैवविविधता नष्ट केली जात आहे असा आरोप करण्यात आला. तसेच एका बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप केला गेला. या रस्त्याच्या विरोधात हजारो नागरिकांनी मोर्चा देखील काढला होता. हा प्रकल्प पर्यावरण विरोधी असल्याचा आरोप करत नागरी चेतना मंचाने उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती.

पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) विधी सल्लागार निशा चव्हाण (Adv Nisha Chavan) म्हणाल्या, ” बालभारती पौड फाटा रस्ता प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या आम्ही घेणार आहोत, विकास आराखड्यात हरकती, सूचना घेऊन याचा समावेश डीपीत केला होता अशी भूमिका महापालिकेने न्यायालयात मांडली. ती बाजू योग्य वाटल्याने रस्ता करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) कॅव्हेटही दाखल केले जाणार आहे.” (Balbharati To Paud Phata Road Project)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed