Local Train Block | 26 मार्चपर्यत काही रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द; जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Local Train | A big gift for Mumbaikars on Republic Day; 14 AC local services started on Harbour Line, relief for passengers

मुंंबई :- Local Train Block | मध्य रेल्वेने (Central Railway) चार दिवसांचा विशेष ब्लॉक घेतला असून, अनेक रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. 23 ते 26 मार्च असा चार दिवसांचा हा विशेष ब्लॉक घेण्यात आला असून, या काळात मध्य रेल्वेच्या लोकल प्रवाशांनी प्रवास शक्यतो टाळावा.

लोकल प्रवाशांसाठी (Local Train) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने चार दिवसांचा विशेष ब्लॉक घेतला असून अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.दिनांक 23 ते 26 मार्च असा चार दिवसांचा हा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी प्रवास शक्यतो टाळावा.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. भुसावळ विभागातील म्हसावद स्थानक येथे अप लूप लान (Loop Line) विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. अप लूप लाइनचा 714 मीटरवरून 756 मीटरपर्यंत विस्तार केला जाणार आहे. तसेच, गतीवाढीकरीता यार्ड पुनर्रचनेचेही काम हाती घेतले आहे. यासाठी नॉन इ़टरलॉकिंग कार्य तसेच, अन्य काही गोष्टींसाठी हा ब्लॉक घेण्यात आला. याचा काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. पुढील 26 मार्चपर्यत काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द राहणार आहेत. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले. (Local Train Block)

‘या’ गाड्या रद्द

  • मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणारी 11113 क्रमांकाची देवळाली ते भुसावळ मेमू गाडी.
  • 11114 क्रमांकाची भुसावळ ते देवळाली मेमू गाडी.
  • 01212 क्रमांकाची नाशिक ते बडनेरा मेमू गाडी.
  • 01211 बडनेरा ते नाशिक मेमू या क्रमांकांच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द असेल.

You may have missed