Futures Market Trading Ban | ‘या’ सात शेतीमालांच्या वायदेबंदीची मुदत वाढवली; ‘सेबी’चा मोठा निर्णय
मुंबई : Futures Market Trading Ban | भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डने (सेबी) गहू, मूग आणि इतर सात कृषी उत्पादनांच्या फ्युचर्स ट्रेडिंगवर आणखी एका वर्षासाठी निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आता 31 मार्च 2026 पर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. शेतीमालाच्या किमतीत स्थैर्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
‘सेबी’ने 19 डिसेंबर 2021 मध्ये प्रथमच सात कृषी उत्पादनांवरील वायदे बाजार व्यापारावर मर्यादा लादल्या होत्या. त्यानंतर ही बंदी वेळोवेळी वाढवण्यात आली होती. आता ही मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढविली आहे.
काय आहे वायदे बाजार ?
वायदे बाजार हा एक व्यापार पद्धतीचा प्रकार आहे, ज्यात गुंतवणूकदार आणि व्यापारी ठराविक तारखेला आणि किमतीला कृषी उत्पादनांची खरेदी अथवा विक्री करण्यासाठी करार करतात. तसेच, सेबीच्या नव्या निर्णयामुळे गहू, मूग आणि अन्य सात कृषी उत्पादनांसाठी अशा प्रकारचा व्यापार आता बंद राहणार आहे.
‘या’ कृषी उत्पादनांवरील वायदे बाजार व्यापार बंद
1 – बासमती नसलेला भात
2 – गहू
3 – हरभरा
4 – मोहरी आणि तिची उत्पादने (उदा. मोहरी तेल)
5 – सोयाबीन आणि त्याची उत्पादने (उदा. सोयाबीन तेल)
6 – कच्चे पाम तेल
7 – मूग
