Eknath Khadse On Shambhuraj Desai | खडसेंनी मंत्री देसाईंना सभागृहात झापले; ‘फक्त तुम्हालाच काम असतं का?’
मुंबई : Eknath Khadse On Shambhuraj Desai | महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) बुधवारी, आज शेवटचा दिवस आहे. यादिवशी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे हे मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
विधान परिषदेचे कामकाज सुरू झाले, तेव्हा सभागृहात मंत्री नसल्याने आमदार एकनाथ खडसे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. विधान परिषदेचे कामकाज सुरू झाले, तेव्हा संपूर्ण सभागृहात विरोधी पक्षातील एक आमदार स्वत: खडसे आणि सत्ताधारी पक्षात केवळ दोन सदस्य उपस्थित होते. शंभूराज देसाई आणि जयकुमार रावल असे दोन्ही मंत्री उपस्थित होते. या वेळी बोलताना खडसे म्हणाले की, अंतिम आठवडा प्रस्ताव ज्याला अधिवेशनात सर्वोच्च स्थान आहे, त्याला कुणीच सदस्य नाही. केवळ दोन मंत्री आले आहेत. शंभूराज हे चालणार नाही.
सरकार किती असंवेदनशील आहे. याचे हे उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले. शंभूराज देसाई यांनी बाजू सावरताना ब्रीफिंगला वेळ लागला असल्याचे म्हटले. त्याला प्रत्युत्तर देताना खडसे म्हणाले की, मीसुद्धा पंधरा वर्ष मंत्री राहिलो आहे. सर्व मंत्र्यांचे ब्रीफिंग नसते. कामकाज मलाही माहिती आहे. फक्त तुम्हालाच काम असतं का? आम्हाला काही कळत नाही का, असा सवालच त्यांनी केला.
