Kothrud Pune Crime News | ज्येष्ठ नागरिकांच्या फ्लॅटमध्ये चोरी करणारे अल्पवयीन ताब्यात ! कोथरुडमधील हॅपी कॉलनीतील घटना, अल्पवयीनांकडून साडेपाच लाखांचे दागिने जप्त

Alankar Police

पुणे : Kothrud Pune Crime News | कोथरुड भागातील हॅपी कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिकांच्या फ्लॅटमधून साडेपाच लाखांचे दागिने चोरुन पसार झालेल्या अल्पवयीनांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साडेपाच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. हे दोघे अल्पवयीन सराईत गुन्हेगार आहेत.

कोथरुडमधील हॅपी कॉलनीत राहणारे हे ज्येष्ठ नागरिक ७ मार्च रोजी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्याने कुलूप तोडून घरातील १४४ ग्रॅमचे सोन्याचे दागिने व रोकड चोरुन नेली होती. तपास पथकाने या घरफोडीचा तपास सुरु केला. त्यात परिसरातील २०० ते २५०सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. त्यावरुन पोलिसांनी या अल्पवयीन चोरट्यांचा माग करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपयांचे ४९ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

चौकशीत एका अल्पवयीनांच्या भावाकडे उर्वरित दागिने असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने हडपसर भागातून पृथ्वीराज ऊर्फ साहिल संतोष आबाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून साडेपाच लाख रुपयांचे ६९ ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले. चोरीला गेलेल्या १४४ ग्रॅम दागिन्यांपैकी ११८ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी पाटील, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, पोलीस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, शशिकांत सपकाळ, अतुल क्षीरसागर, शिवाजी शिंदे, अंकुश लोंढे, साईनाथ पाटील, नवनाथ आटोळे, माधुरी कुंभार, सोनल म्हसकुले यांनी केली आहे.

You may have missed