Maharashtra Politics News | ‘ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का ?’, शिवसेना ठाकरे गटाने शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं; पुण्यात बॅनरबाजी (Video)

Shivsena UBT

पुणे : Maharashtra Politics News | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विंडबन गीत तयार करून टीका केल्याने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा प्रचंड चर्चेत आला आहे. रविवारी सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संदर्भात एक गाणे पोस्ट केले. या गाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केल्याने वादंग निर्माण झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावरून आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/DHqT4dDJWIX

दरम्यान कुणाल कामरा प्रकरणावरून आज पुण्यात शिवसेना उबाठा गटाने शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. कुणाल कामराच्या कवितेचा संदर्भ देत ठाकरे गटाने बॅनरबाजी केल्याचे या बॅनरवरील मजकुरातून लक्षात येते. ‘ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का ?’ असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्यासह कुणाल कामरा यांचा फोटोही लावण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याचा विंडबन गीताचा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेनेच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली. खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. याठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी धुडगुस घातल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान या राड्यावरून आणखी एक विडंबन गीताचा व्हिडिओ करत कुणाल कामराने शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं आहे.

हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल
हम होंगे कंगाल एक दिन..

मन मैं अंधविश्वास
देश का सत्यानाश
हम होंगे कंगाल एक दिन..

होंगे नंगे चारो और,
करेंगे दंगे चारो और…

पुलिस के पंगे चारो और,
एक दिन…

मन मैं नथुराम
हरकते आसाराम…
हम होंगे कंगाल एक दिन..

होगा गाय का प्रचार,
लेके हाथों में हथियार
होगा संघ का शिष्टाचार…
एक दिन..

जनता बेरोजगार
गरीबी की कगार
हम होंगे कंगाल एक दिन

असं गाणं कुणाल कामराने गायलं आहे.

You may have missed