Sweety Boora and Deepak Hooda | ‘माझा नवरा समलिंगी, त्याला मुलांमध्ये इंटरेस्ट..’; वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटीचे पती दीपक हुड्डावर गंभीर आरोप

नवी दिल्ली ः Sweety Boora and Deepak Hooda | हरियाणाची वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बुरा हिने पती भारताचा माजी कर्णधार (कबड्डी) दीपक हुड्डा याच्यावर एक गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, याचा व्हिडिओ समाज माध्यमावर S(ocial Media) प्रसारित केला आहे.
स्वीटी बुरा हिने पोलीस ठाण्यात दीपक हुड्डाला मारहाण केली होती. याचा व्हिडिओही प्रसारित झाला होता. आता पुन्हा एकदा गंभीर आरोप केल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. स्वीटी बुरा म्हणाली की, माझा पती समलिंगी आहे, त्याला मुलांमध्ये इंटरेस्ट आहे. मला त्याने व्हिडिओ दाखवण्यासाठी बोलावले होते. मात्र, व्हिडिओच्या सुरुवातीचा आणि शेवटचा किस्सा कट करण्यात आला. कट करण्यात आलेल्या भागात दीपकने मला शिवीगाळ केली होती. त्यानंतर मला पॅनिक अटॅक आला होता. पुढे बोलताना स्वीटीने आरोप केला की, एसपीही दीपकसोबत मिळाला आहे. दोघांनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
”व्हिडिओ कट करुन सर्वांसमोर दाखवण्यात आला. माझे वडील आणि मामा यांचे नाव दीपकने एफआयआरमध्ये (FIR) नोंदवले. मात्र, व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, माझे वडील आणि मामा दीपकजवळ नव्हते. दीपकने खोट्या वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. माझ्या मामा, वडिलांवर खोटी एफआयआर नोंदवली आहे,” असे स्वीटी बुराने सांगितले
स्विटीने हात जोडून व्हिडिओ केला आहे आणि सांगितले की, मला फक्त घटस्फोट हवा आहे. मी त्याच्याकडे त्याची मालमत्ता मागितली नाही, पैसेही मागितले नाहीत. दीपकनेच माझ्याकडून पैसे घेतले आहेत, असाही आरोप तिने केला.
नेमके प्रकरण काय?
स्वीटी आणि दीपक यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. स्विटीने पती दीपक याच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. लग्नात एक कोटी रुपये, फॉर्च्युनर देऊनही कमी हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचे तिने सांगितले. दीपकने स्वीटी आणि तिच्या कुटुंबीयांची मालमत्ता हडप केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला. दीपकने सांगितले की, स्वीटीने झोपेत असताना त्याचे डोके फोडले आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला. दोघांच्या तक्रारीवरून हिसार आणि रोहतकमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. स्वीटी आणि दीपक सध्या भाजपचे नेते आहेत.