Disha Salian Case | दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे डिप्रेशनमध्ये….; पोलिसांचा मोठा दावा

मुंबई : Disha Salian Case | राज्यात दिशा सालियान मृत्यू प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच आता नवीन ट्विस्ट आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलून गेली आहे. दिशा सालियानने तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे डिप्रेशनमध्ये जाऊन तिने १४ मजल्यावरुन उडी मारत आपलं जीवन संपवल्याचा दावा मुंबईतील मालवणी पोलिसांनी केला आहे.
दिशा सालियान प्रकरणाचा सुरुवातीला तपास करणाऱ्या मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये तिने आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले होते. यामध्ये तिने कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमध्ये त्यांना पैसे देऊन ती वैतागली होती.
याबाबत तिने आपल्या मित्रांकडे देखील भाष्य केले होते. यामुळे प्रचंड तणावात आणि डिप्रेशनमध्ये असल्याने दिशा सालियान हिने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांनी आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले होते, याबाबत माध्यमांनीही वार्तांकन केले आहे. ‘