Agriculture News | फळ भाजीपाला लागवडीसाठी अनुदान मंजूर; राज्य सरकारचा निर्णय, ‘या’ शेतकऱ्यांना लाभ मिळणार

Vegitables

मुंबई : Agriculture News | राज्यातील आदिवासी कुटुंबांसाठी (Tribal Family) परसबाग लागवड योजनेला गती देण्यासाठी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी चार लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे 14 आदिवासी जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांना फळझाडे आणि भाजीपाला लागवडीसाठी अनुदान आणि मार्गदर्शन मिळणार आहे. याबाबत राज्य सरकारने (Maharashtra Government) निर्णय घेतला आहे.

ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती आणि गोंदिया या 14 आदिवासी जिल्ह्यांत ही योजना प्रभावीपणे राबवली जाणार आहे. आदिवासी समाजातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी 2003-04 पासून हा उपक्रम सुरू केला होता.

योजनेची अंमलबजावणी कशी?

लाभार्थी कुटुंबांची निवड करून त्यांना भाजीपाला, फळझाडे लागवडीसाठी मदत केली जाईल. झाडांची योग्य निगा राखण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन दिले जाईल. आदिवासी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसंबंधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक कृषी व आदिवासी विकास विभाग काम करेल.

आदिवासी परसबाग योजना’ ही आदिवासी कुटुंबांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यासाठी त्याचबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. राज्य सरकारने योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद केली असून, तिची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल. त्यामुळे, ही योजना आदिवासी समुदायासाठी एक नवीन आर्थिक आधार बनेल.

You may have missed