Three Cops Suspended | ट्रकचालकाकडून पैसे घेणं अंगलट आलं, ५० रुपयांसाठी पोलिस खात्याची गमावली नोकरी, तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन; पोलीस दलात खळबळ

Two Pune Crime Branch Constables Suspended | Two Pune Crime Branch Constables Suspended for Links with Illegal Gambling Operators; Department on Alert

जळगाव : Three Cops Suspended | वाहतूक पोलीसाला फक्त ५० रुपयांसाठी पोलिस खात्याची नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. संबंधित पोलिसांचा संशयास्पद व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिस खात्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ट्रकचालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने चौकशी करून पाचोरा पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस पवन पाटील याला निलंबित केले आहे. (Jalgaon Police News)

https://www.instagram.com/p/DH3VV2tpoJ5

प्राथमिक तपासात पवन पाटील याने ट्रक चालकाकडून ५० रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले. व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

You may have missed