Pune Crime News | पेट्रोल पंपावरील मॅनेजरने मालकाला घातला पावणे तीन कोटींचा गंडा; ऑडिटमध्ये उघड झाला अपहाराचा प्रकार, कुंजीरवाडी येथील अ‍ॅटो कॉर्नरवरील घटना

Fraud

पुणे : Pune Crime News | गेली १५ वर्षे मॅनेजर म्हणून काम पाहणाºयानेच विश्वासघात करुन पेट्रोल पंपमालकाला तब्बल २ कोटी ६३ लाख १५ हजार ९४२ रुपयांना गंडा घातला आहे़ वडिलांच्या निधनानंतर मुलाकडे पेट्रोल पंपाचा कारभार आला़ वडिलांचा विश्वासघात करुन मॅनेजरने स्वत:च्या खात्यावर पैसे घेऊन ही फसवणूक केली आहे. (Cheating Fraud Case)

याबाबत अक्षय बाळकृष्ण काळे (वय ३६, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मॅनेजर नितीन रामचंद्र रायपुरे (वय ५२, रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार कुंजीरवाडी येथील अ‍ॅटो कॉर्नर पेट्रोलपंपावर २०१८ ते मार्च २०२४ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय काळे यांचा कुंजीरवाडी येथे अ‍ॅटो कॉर्नर हा पेट्रोल पंप आहे. रायपुरे हा गेली १५ वर्षे तेथे मॅनेजर म्हणून काम पहातात. काळे यांच्या वडिलांचे इतरही व्यवसाय असल्यामुळे पंपावरील सर्व कारभार रायपुरे याच्या हातात होता. काळे यांच्या वडिलांचा रायपूरे याच्यावर खूप विश्वास होता. वडिलांच्या निधनानंतर अक्षय काळे यांच्याकडे पंपाचा कारभार आला. पंपावरुन इंधनाची विक्री तर होतेय, मात्र तेवढा नफा दिसत नाही. हे पैसे कोठे जातात, हे त्यांना समजत नव्हते. त्यामुळे काळे यांनी पंपाचे ऑडिटरमार्फत ऑडिट करुन घेतले. त्यामध्ये पेट्रोल पंपावरुन इंधन विक्री केलेले पैसे रायपुरे हा आपल्या स्वत:च्या बँक खात्यात घेत असल्याचे दिसून आले. गेल्या ६ वर्षात नितीन रायपुरे याने पेट्रोल पंपावरुन विक्री झालेल्या इंधनापैकी तब्बल २ कोटी ६३ लाख १५ हजार ९४२ रुपयांचा अपहार केल्याचे या ऑडिटमध्ये दिसून आले. त्यानंतर काळे यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार तपास करीत आहेत..

You may have missed