Pune Crime News | रामनवमी मिरवणुकीत सहायक पोलीस आयुक्तांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न; धायरीतील मुक्ताई मार्डनजवळील घटना

पुणे : Pune Crime News | रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या दरम्यान वाहतूक नियोजन करणारे सहायक पोलीस आयुक्त अजय परमान यांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याबाबत पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार धायरीतील मुक्ताई गार्डनजवळ रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडवरील धायरी भागात श्री रामनवमीनिमित्त रविवारी मिरणुका काढण्यात आली होती. मिरवणुक बंदोबस्तात पोलीस वाहतूक नियमन करत होते. असे असताना एका मोटारचालकाने त्याची कार बेदरकारपणे निष्काळजीनपणे चालवत आला. यावेळी सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला होता. त्या इशार्याकडे दुर्लक्ष करुन वाहन पुढे घेऊन त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. चालकाने वाहन रोडचे मध्ये लावून वाहतूकीला अडथळा निर्माण केला. कारचालक व त्याच्या बरोबरच्या माणसाने आरडा ओरडा व झटापट करुन सार्वजनिक काम करत असताना पोलिसांना अटकाव केला. तेथून पोलिसांना गुंगारा देऊन तो पळून गेला.
नांदेड सिटी पोलिसांनी कारच्या नंबरवरुन त्याचा शोध घेतला़ परंतु, तो घरी मिळून आला नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी सांगितले.