Crime News | अनैतिक संबंधातून इंजिनिअर पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार, बेशुद्ध पडल्यानंतर गळा चिरला

नोएडा : Crime News | अनैतिक संबंधातून इंजिनिअर असलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आसमा खान (वय-४४) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर नुरुल्लाह हैदर (वय-५५) असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना नोएडातील सेक्टर १५ मध्ये घडली.
आसमाच्या मेहुण्याने सांगितले की, आसमाच्या मुलीने या घटनेची माहिती दिली. गेल्या दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. पण, तिची हत्या करेल असे कधी वाटले नव्हते. आसमा सिव्हील इंजिनिअर होती आणि पाश परिसरातील सेक्टर १५ मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून ती काम करायची. या हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. आसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. फॉरेन्सिकच्या पथकाने घरातून पुरावे गोळा केले आहेत. आसमाचा पोस्टमार्टम रिपोर्टही आला असून, त्यातही डोक्यात मारल्याने आसमा कोमामध्ये गेली होती, असे म्हटले आहे.
पोलीस चौकशीत नुरुल्लाह हैदर याने सांगितले की, आसमा झोपलेली होती. तेव्हा मी तिच्या डोक्यात हातोड्याने वार केला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर मी तिचा गळा चिरला. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.