Pune Police Tadipari Action | पुणे : एकाचवेळी 10 सराईत गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून तडीपार; पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांची कारवाई

पुणे : Pune Police Tadipari Action | रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस कारवाई करुन गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी एकाचवेळी १० सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. (Pune Crime News)
फिरोज महंमद शेख (वय २९, रा. घोरपडे वस्ती, कदमवाक वस्ती, ता. हवेली) याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे एकूण ४ गुन्हे दाखल होते़ डॉ. राजकुमार शिंदे यांनी त्याला २ वर्षे पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
प्रसाद दत्तात्रय जेठीथोर (वय २० रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, सध्या रा. लोणी स्टेशन) याच्यावर बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगुन दहशत निर्माण करणे, मारहाण करणे दुखापत करणे, खासगी मालमत्तेचे नुकसान करणे यासारखे ३ गुन्हे दाखल आहेत. त्याला २ वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
चंद्रशेखर ऊर्फ चंद्रकांत ऊर्फ पिल्या दाजी चोरमोले (चोरमले) (वय २३, रा. गायकवाड चाळ, माळीमळा, लोणी काळभोर) याला बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मारहाण, धमकावणे, दहशत निर्माण करणे, खासगी मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारे ५ गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
अजय दीपक जाधव (वय ३५, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) याच्यावर बेकायदेशीर जमाव जमविणे, बलात्कार, मारहाण, दुखापत करणे यासारखे १० दाखलपात्र व अदखलपात्र गुन्हे मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
हनुमंत ऊर्फ बापू दगडु सरोदे (वय ४८, रा. कॅनॉल शेजारी, भीमनगर, मुंढवा) याच्यावर बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे, मारहाण, धमकावणे यासारखे ७ दाखलपात्र व अदखलपात्र गुन्हे मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
साहिल राजू साठे (वय १९, रा. केशवनगर, मुंढवा) याच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, दरोडा तयारी, शिवीगाळ करणे, मारहाण करणे, हत्यार बाळगून दहशत निर्माण करणे असे ५ गुन्हे मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
वसीम सलीम पटेल (वय ४०, रा. पटेल क्लासिक, साईबाबानगर, कोंढवा खुर्द, मुळ रा. दांडेकर पुल) याच्याविरुद्ध जबरी चोरी, चोरी, विनयभंग, अंमली पदार्थ विक्रीकरीता जवळ बाळगणे, हत्यार बाळगणे असे ८ गुन्हे कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
वसीम ऊर्फ वस्सु शकील खान (वय २५, रा. भाग्योदयनगर, मुबारक मंजिल,कोंढवा) याच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, हत्यार बाळगणे, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणे, अंमली पदार्थ विक्रीकरीता जवळ बाळगणे असे ४ गुन्हे कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
ओंकार शिवानंद स्वामी (वय २३, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) याच्यावर गंभीर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, धमकावणे, हत्यार जवळ बाळगणे असे ४ गुन्हे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
आदिराज मनोज कामठे (वय २१, रा. भागीरथीनगर, साडेसतरानगळी रोड, हडपसर) याच्यावर जबरी चोरी, मारहाण, धमकावणे, दुखापत करणे, हत्यार जवळ बाळगणे यासारखे ३ गुन्हे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
या सर्व सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी आणखी काही गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए, तडीपार कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.
२०२५ मधील पहिल्या तीन महिन्यात परिमंडळ ५ मधील ९ सराईत गुन्हेगारांवर एम पी डीए प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३ मोका कारवाईमध्ये २१ गुन्हेगार जेरबंद करण्यात आले आहे. आजपर्यंत ११ गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत़ मागील १०० दिवसात ५१ सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.