Mumbai Crime News | घरी आसरा देऊन मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ काढले, प्रायव्हेट व्हिडिओद्वारे वारंवार शरीरसुखाची मागणी, संतापलेल्या तरुणीने प्रियकराच्या मदतीने टॅक्सी चालकाला संपवलं

Mumbai Crime

मुंबई : Mumbai Crime News | वारंवार शरीरसुखाची मागणी करत असल्याच्या त्रासाला कंटाळून संतप्त झालेल्या एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने टॅक्सी चालकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुरेंद्र पांडे असे हत्या झालेल्या टॅक्सी चालकाचे नाव आहे. घरामध्ये कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. हत्येनंतर आरोपी या टॅक्सी चालकाची कार घेऊन फरार झाले. पोलिसांनी रिया सरकल्याणसिंग आणि तिचा प्रियकर विशाल शिंदे या आरोपींना संगमनेरमधून अटक केली आहे.

अधिक माहितीनुसार, सुरेंद्र पांडेने रियाला आपल्या घरी आसरा दिला होता. याच दरम्यान सुरेंद्रने रिया आणि तिच्या प्रियकराचे अश्लिल व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये चित्रित केले होते. प्रायव्हेट व्हिडिओद्वारे सुरेंद्र रियाकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत होता. यावरूनच सुरेंद्र, रिया आणि विशाल यांच्यामध्ये वाद झाला असता घरातील हातोडीने सुरेंद्र पांडे याच्या डोक्यात वार करत त्याची हत्या केली. सुरेंद्रची हत्या केल्यानंतर रिया आणि विशाल या दोघांनी पळ काढला. हत्येनंतर दोघे विशालच्या गावी संगमनेर येथे गेले. घरी पोहोचताच त्यांनी संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगितला.

कुटुंबियांनी दोघांनाही तात्काळ संगमनेर पोलिस ठाण्यात स्वतःला हजर करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रिया आणि विशाल यांनी संगमनेर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. संगमनेर पोलिसांनी सदर घटनेची माहिती उलवे पोलिसांना देत दोन्ही आरोपीना नवी मुंबई पोलीसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी उलवे पोलिस आता अधिक तपास करीत आहेत.

You may have missed