MNS Leader Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांना फोन करून धमकी; मराठी-अमराठीचा वाद चिघळणार

Sandeep-Deshpande

मुंबई : MNS Leader Sandeep Deshpande | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांना एका अज्ञाताने फोन करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एक ऑडिओ क्लीप समोर आली आहे. संदीप देशपांडे यांनी आलेल्या धमकीबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली आहे.

काल रात्री सव्वा दहा वाजता फोन आला. या अज्ञात व्यक्ती नुसत्याच शिव्या घालत होता. पुन्हा कॉल आला, तेव्हा पण तुम्हाला घरी येऊन मारू. असे म्हणाला. पण मी अशा धमक्यांना घाबरत नाही, असे संदीप देशपांडे म्हणाले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबई-महाराष्ट्राचा वातावरण बदलायचा प्रयत्न कोण करत आहे, याचा तपास करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदू विरोधी आहेत, त्यांनी माफी मागावी, मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द व्हावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेनेने केली होती. मनसे ब्राह्मण समाजाच्या व्यक्तींना मारहाण केल्याचे उत्तर भारतीय विकास सेनेने म्हटले. या मागणीवर मनसेने प्रत्युत्तर देताना एका भैय्या आमच्या पक्षाची मान्यता रद्द करा म्हणत असतील, तर त्यांना मुंबईत राहू द्यायचे की नाही, याचा विचार आम्ही करू, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आल्याची चर्चा आहे.

You may have missed