Pune Temperature News | पुण्यात कमाल तापमान 41.3 अंश सेल्सिअस; एप्रिल महिन्यातील तिसरे सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद, लोहगाव येथे 42.7 अंश सेल्सिअस

पुणे : Pune Temperature News | गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. मंगळवारी पुणे शहरात दिवसभर उन्हाचा प्रचंड चटका जाणवत होता. या वर्षीतील एप्रिल मधील सर्वाधिक कमाल ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची मंगळवारी नोंद झाली. पुण्यातील एप्रिल महिन्यातील आजवरचे सर्वाधिक कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअस ३० एप्रिल १८९७ रोजी नोंदविण्यात आले आहे.
मंगळवारी अकोला येथे राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ४४.१ अंश सेल्सिअस नोंद झाली. विदर्भातील बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे.
पुणे शहरात सर्वाधिक कमाल तापमान कोरेगाव पार्क येथे ४१.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून सर्वात कमी कमाल तापमान लवासा येथे ३७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
पुणे शहर हे एकेकाळी थंड हवेसाठी लोकप्रिय होते. हवामान विभागाच्या नोंदीनुसार पुणे शहराचे एप्रिल महिन्यातील सरासरी कमाल तापमान ३७.६ अंश सेल्सिअस आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कमाल व किमान तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. यापूर्वी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्या वर्षाती सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद होताना यापूर्वी दिसत असे. यंदा मात्र, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात कमाल तापमान ४१ अंशाच्या पुढे गेले आहे.
लोहगाव येथे मंगळवारी ४२.७ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारीही कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस होते.
यापूर्वी २९ एप्रिल २०१९ रोजी कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.
प्रमुख वर्ष व एप्रिल मधील कमाल तापमान
६ एप्रिल २०२१ – ३९.६
१७ एप्रिल २०२० – ४०.१
२९ एप्रिल २०१९ – ४३
३० एप्रिल २०१३ – ४१.३
३० एप्रिल १८९७ – ४३.३ (आतापर्यंतचे सर्वाधिक)