Warje Pune Fire News | पुणे : वारजे माळवाडीतील घरात गॅस सिलिंडरच्या स्फोटात दोघांचा मृत्यु

fire

पुणे : Warje Pune Fire News | वारजे माळवाडी परिसरातील गोकुळनगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात दोघा जणांचा मृत्यु झाला.

मोहन माणिक चव्हाण (वय ४३), आतिश मोहन चव्हाण (वय २३ दोघे सध्या रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

गोकुळनगर भागात एका पत्र्याच्या खोलीत मोहन आणि आशिष राहायला होते. पहाटे १ वाजून ५६ मिनिटांनी सिलिंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याची माहिती वारजे अग्निशमन केंद्राला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर, तांडेल मरळ, जवान भिलारे, माने, साळुंखे, ओव्हाळ यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. दोघांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

You may have missed