Pune Crime News | शंतनु कुकडे बलात्कार प्रकरणात प्रसिद्ध वकिलासह 6 जणांना अटक; भुतानमधील महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन केला अत्याचार, ९ जणांवर गुन्हा दाखल (Video)

Pune Crime

पुणे : भूतानवरुन आलेल्या आणखी एका महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर ९ जणांनी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शंतनु कुकडे याला बलात्कार प्रकरणात अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. समर्थ पोलिसांनी याप्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल करुन एका वकिलासह ६ जणांना अटक केली आहे़ जालींदर बडदे, उमेश शहाणे हे दोघे फरार आहेत. (Rape Case)

https://www.instagram.com/reel/DIN5UpiJ0CX/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
ऋषिकेश गंगाधर नवले (वय ४८) , प्रतीक पांडुरंग शिंदे (वय ३६), अ‍ॅड. विपीन चंद्रकांत बिडकर ( वय ४८) सागर दशरथ रासगे ( वय ३५), अविनाश नोएल सूर्यवंशी (वय ५८) आणि मुद्दसीर इस्माईल मेमन ( वय ३८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नोकरीसाठी आलेल्या असहाय्य महिलांना आश्रय देण्याच्या नावाखाली त्यांच्यावर बलात्कार केल्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शंतनु कुकडे याला समर्थ पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे.

पोलिसांनी सहा जणांना मंगळवारी न्यायालयात हजर केले होते. सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी न्यायालयात सांगितले की , पीडित महिला भूतान देशाच्या नागरिक असून, त्या नोकरीच्या शोधात पुण्यात आल्या होत्या. त्या निराधार आणि असहाय्य्य असताना शंतनु कुकडे याने राहण्याची व जेवणासाठी सोय करुन त्यांच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. त्याच्या इतर साथीदारांनीही त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने त्यांच्या इच्छेविरुद्ध शरीसंबंध केले. पीडितेने आरोपींच्या नावानिशी तक्रार दिली आहे. आरोपी हे एकमेकांचे मित्र असून, त्यांना गुन्हा करण्यास कुणी प्रवृत्त केले? तसेच दाखल गुन्हयात त्यांचे इतर कुणी साथीदार आहेत का? याचा तपास करायचा आहे. गुन्हयाच्या अनुषंगाने आरोपींची वैद्यकीय चाचणी करायची आहे. तसेच या आरोपींनी आणखी कोणा निराधार महिलांचे शोषण केले आहे का याचा तपास करायचा असल्याचे सांगण्यात आले. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

You may have missed