Akola Crime News | आर्थिक वादातून डोक्यात दगड घालून व्यावसायिकाची निर्घृण हत्या

Akola Crime

अकोला : Akola Crime News | आर्थिक वादातून डोक्यात दगड घालून व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. रमण चांडक असे निर्घृण हत्या झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. अकोट तालुक्यातील पोपटखेड रोडवरील बंद असलेल्या एका कारखान्याच्या इमारतीमध्ये व्यापाऱ्याचा मृतदेह आढळून आला. (Murder Case)

अधिक माहितीनुसार, रमण चांडक हे मूळचे अकोट तालुक्यातील पणज गावचे रहिवासी होते. गेल्या काही वर्षांपासून रमण चांडक अकोल्यातील गीता नगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते. चांडक यांचा ऑटो डिलिंगचा व्यवसाय होता. अलीकडच्या काळात त्यांचा काही लोकांसोबत आर्थिक वाद सुरू होता. या वादातूनच त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गजानन नावाच्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You may have missed