Pune Crime Court News | पुणे : खंडणी व खाजगी सावकारीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Pune Crime Court News | Accused sentenced to life imprisonment in the murder case of Sarpanch's husband

पुणे : Pune Crime Court News | फिर्यादी विजय पांडे यांनी यातील आरोपी ज्ञानेश्वर पवार यांचेकडून घेतलेल्या १ लाख रुपयांचे मोबदल्यात फिर्यादी यांनी आरोपीस नोव्हेंबर २०१८ पासून ते माहे जुलै २०२१ पर्यन्त रोख, ऑन लाईन ट्रान्सफर, गुगल पे व ए.टी.एम. डिपॉझीटव्दारे २ लाख ९० हजार रुपये परत केले असताना देखील आरोपीने फिर्यादी यांना वारंवार फोन करुन वाईट वाईट शिवीगाळी करुन धमकावून, फिर्यादी यांचा मानसिक छळ करुन फिर्यादी यांचेकडे मुददल रक्कम म्हणून १ लाख रुपये व माहे एप्रिल २०२० ते माहे जुलै २०२० असे चार महिन्यांचे प्रत्येकी १० हजार रुपये प्रमाणे ४० हजार रुपये असे एकूण १ लाख ४० हजार रुपयांची जबरदस्तीने मागणी करीत असल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर खटला चालविला असता सदर खटल्यातील आरोपीतर्फे अँड शुभम शंकर लोखंडे (Adv Shubham Shankar Lokhande) यांचा युक्तिवाद मे, प्रथमवर्ग कोर्टाने ग्राह्य धरून सबळ पुरावे अभावी ज्ञानेश्वर पवार यांची निर्दोष मुक्तता झाली.

You may have missed