Transport Minister Pratap Sarnaik | एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

Pratap-Sarnaik

मुंबई : – Transport Minister Pratap Sarnaik | एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता एसटी महामंडळावर अधिकृतपणे प्रताप सरनाईकच राहणार असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे.

महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहनसेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे परिवहनमंत्री सरनाईक यांनी म्हटले आहे. तसेच, आपल्याला या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

दरम्यान, परिवहन मंत्री सरनाईक यांनी परिवहन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर काहीच दिवसामध्ये बस प्रवासात १४.९५ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दरवाढीवरून राज्यभरात प्रवाशांची तीव्र नाराजीची लाट उसळली होती. तसेच, विरोधकांनीही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आता एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवरून एसटी कर्मचांऱ्यांमध्ये चिंता आहे.

You may have missed