Pune News | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आर्थिक मदत भिसे कुटुंबीयांनी नाकारली; कारण काय?

पुणे : – Pune News | पुण्यातील मृत गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आर्थिक मदत नाकारली आहे. सुशांत भिसे यांनी ही रक्कम नाकारली. शिंदे यांनी गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. मात्र, ती मदत भिसे कुटुंबीयांनी नाकारली. याआधीही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. तीही त्यांनी नाकारली होती. (Tanisha Bhise Death Case)
चुकीच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून ५ लाख रुपये देण्यात येत होते. पण ते भिसे कुटुंबीयांनी नाकारले. ही आर्थिक मदत नाकारत त्यांनी आम्हाला पैसे नको, पण दिनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची इच्छा दाखवली. आर्थिक मदत नाकारण्यामागे कुटुंबाने कारणही दिले आहे. पैसे नको, तर अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करा. तसंच आता दिनानाथ रुग्णालयात डॉक्टरांनी राजीनामा दिला असला, तरी रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा, अशी मागणी भिसे कुटुंबाने केली.