Pune Police Inspectors Transfers | बाणेरसह शिवाजीनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली

pune police transfer

पुणे : Pune Police Inspectors Transfers | नव्या निर्माण करण्यात आलेल्या बाणेर पोलीस ठाण्याचे (Baner Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप (PI Navnath Jagtap) यांची कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे (Shivaji Nagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत (PI Chandrashekhar Sawant) यांची बाणेर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (Sr PI Mahesh Bolkotgi) यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे शहर पोलीस दलातील पोलीस आस्थापना मंडळाच्या २१ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kuamr) यांनी म्हटले आहे.

गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली असलेल्या कॉप्स २४ मधील तिघा पोलीस अंमलदारांनी सोसायटीच्या अध्यक्षांकडून ३ हजार रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण नुकतेच उघड झाले होते. त्याचा संबंध या बदल्याबाबत लावण्यात येत आहे.

You may have missed