Pune Crime News | पुणे : माझा नाद सोड नाही तर खानदान संपवून टाकीन ! सोशल मीडियातील ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

पुणे : Pune Crime News | सोशल मीडियातून झालेल्या ओळखीतून तरुणाने २५ वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने लग्नाविषयी विचारल्यावर “तू माझा नाद सोड नाही तर मी तुझे सर्व खानदान संपवून टाकेन,” अशी धमकी दिली. (Rape Case)
एका २५ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तनुज माकीन (रा़ जबलपूर, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३१ डिसेंबर २०२२ ते ३० जून २०२४ दरम्यान पुणे व ऑनलाइन घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि तनुज माकीन यांची लिंकडीन या सोशल मीडिया अॅपद्वारे ओळख झाली. त्यानंतर त्याने फिर्यादीशी मैत्री केली. मैत्रीचे रुंपातर प्रेमात झाल्यानंतर त्याने फिर्यादीला लग्नाचे आमिष देऊन स्वत:च्या फ्लॅटवर बोलावले. तेथे फिर्यादीशी शरीरसंबंध ठेवले. फिर्यादीने लग्नाबाबत विचारणा केल्यावर तो तिच्याशी बोलणे टाळु लागला. तेव्हा आरोपीने तुला माझ्याशी बोलायचे असेल तर तु मला तुझे अश्लिल फोटो व व्हिडिओ काढून पाठव, असे बोलल्याने फिर्यादीने त्याला नकार दिला. त्यानंतर तनुज याने त्याचे अश्लिल फोटो फिर्यादीच्या व्हॉटसअॅपवर पाठवून विनयभंग केला. तनुज याने बोलणे बंद केल्यावर त्याला विचारणा करण्यासाठी फिर्यादी याच्या राहत्या ठिकाणी गेल्या असता तनुज याने तिला मारहाण करुन “तू माझा नाद सोड नाही तर मी तुझे सर्व खानदान संपवून टाकेल,” अशी धमकी दिली. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.