Pune Crime News | मुलांच्या भांडणातून गल्लीत वाहनांची तोडफोड; पाषाण येथील संजयनगर भागातील घटनेत चार दुचाकींची तोडफोड करुन माजवली दहशत (Video)

पुणे : Pune Crime News | पाषाण भागातील संजयनगर परिसरात मुलांच्या भांडणामधून टोळक्याने तलवारी उगारुन दहशत माजविली. परिसरातील ४ वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
याबाबत अॅड. चेतन शेषराव प्रधान (वय २६, रा. संजयनगर, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी साहिल नागेश कसबे Sahil Nagesh Kasbe (वय १८, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण), आदित्य जगन्नाथ मानवतकर Aditya Jagannath Manavtkar
(वय १८, रा. निम्हण तालीम, पाषाण) आणि मंगेश सोमनाथ जाधव Mangesh Somnath Jadhav (वय १८, रा. लमाण तांडा, पाषाण) यांना अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कसबे व त्याचे मित्र यांचा संजयनगरमध्ये राहणार्या मुलांशी वाद झाला होता. त्यांचे यापूर्वी भांडण झाले होते. त्यातूनच हे चौघे त्यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता संजयनगर येथे आले. त्यांनी रोडच्या बाजुला पार्क केलेल्या मोटारसायकलची दगडाने व तलवारीने तोडफोड करीत आरडाओरडा केला. त्यानंतर ते मोटारसायकलवरुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी गल्लीतील काही लोकांनी पळून जाणार्यांचा पाठलाग केला. त्यांच्यापैकी एकाला पकडले. पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने आपले नाव साहिल कसबे असल्याचे सांगितले. या टोळक्याने चार मोटारसायकलीचे नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक अंगद नेमाणे तपास करत आहेत.