Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Pune-PMC-Water-Supply-News

पुणे: Pune Water Supply | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. गुरुवार (दि.२४) रोजी धायरी येथे मुख्य जलवाहिनीमधून पाण्याची होणारी गळती थांबविणे तसेच पारे कंपनी रोड येथे स्थापत्य विषयक दुरुस्तीच्या कामामुळे पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार (दि.२५) रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग-

पारे कंपनी रोड , गणेश नगर, लिमये नगर, गारमळा, गोसावी वस्ती, बरांगणी मळा, दळवी वाडी, कांबळे वस्ती, मानस परिसर, नाईक आळी , यशवंत विहार बूस्टर वरील संपूर्ण परिसर, लेन नं. १० ते ३४ ए व बी दोन्ही बाजू, रायकर नगर, चव्हाण बाग, त्रिमूर्ती हॉस्पिटल परिसर या भागात पाणीपुरवठा बंद असणार आहे.

You may have missed