Pune Crime News | उकडते म्हणून टेरेसवर गेले झोपायला, इकडे खाली चोरट्यांनी केले घर साफ; कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील घटना

chori (2)

पुणे : Pune Crime News | उन्हाळयाचे दिवस असल्याने उकाड्यामुळे रात्ररात्र झोप येत नाही. त्यामुळे अनेक जण खिडक्या, दारे उघडली ठेवतात. त्याचा गैरफायदा घेऊन चोरटे चोर्‍या करतात. काही जण टेरेसवर झोपायला जातात. इकडे खाली चोरटे कुलूप तोडून घर साफ करतात. कोथरुडमधील शास्त्रीनगरमध्ये असाच प्रकार घडला.

याबाबत अमोल विश्वनाथ काष्टे (वय २५, रा. मराठा महासंघ सोसायटी, शास्त्रीनगर, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पत्नी व दोन मुलासह शास्त्रीनगरमध्ये रहायला आहेत. २० एप्रिल रोजी रात्रीचे जेवण झाल्यानंतर घरात खुप गरम होत होते, म्हणून ते घराला कुलूप लावून रात्री साडेनऊ वाजता शेजारी राहणार्‍या काकुंच्या घराच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेले होते. मुलांची शाळा असल्याने त्यांची पत्नी सकाळी साडेसहा वाजता उठून घरी आली तर घराचा दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले तर घरातील सामान अस्तावेस्त केलेले दिसून आले. चोरट्यांनी रात्रीत कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़. घरातील २२ ग्रॅम सोन्याची चैन, ५ ग्रॅमची अंगठी, साडेतीन ग्रॅमचे मंगळसुत्र, साडेतीन ग्रॅमचे झुमके, दोन ब्रेसलेट, चांदीचा कडा, चांदीच्या तीन अंगठ्या असा २ लाख ४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. (आजच्या बाजारभावाप्रमाणे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज) पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप तपास करीत आहेत.

You may have missed