Pune Crime News | दुचाकीस्वार डॉक्टर तरुणाला धडक देऊन त्याच्या मृत्यु होण्यास कारणीभूत असलेल्या पळून गेलेल्या टँकर चालकाला अटक

पुणे : Pune Crime News | दुचाकीस्वार डॉक्टर तरुणाला धडक देऊन पसार झालेल्या टँकरचालकाला हडपसर पोलसांनी अटक केली़ हडपसरमध्ये सोमवारी ही घटना घडली होती. (Arrest In Accident Case)
राजेंद्र एकनाथ तळेकर (वय ५१, रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा) असे या टँकरचालकाचे नाव आहे. डॉ. ईश्वर साहू (वय २९, रा. सातववाडी, हडपसर, मुळ रा. छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. (Pune Accident News)
डॉ. साहू हे हडपसर भागातील प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेत प्रशिक्षण घेत होते. हडपसर-सातववाडी रस्त्याने ते दुचाकीवरुन सोमवारी २१ एप्रिल रोजी जात होते. त्या वेळी पीएमपी थांब्यासमोर दुचाकीस्वार डॉ. साहू यांना भरधाव टँकरने धडक दिली. अपघातानंतर टँकरचालक पसार झाला. टँकरचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने डॉ. साहू यांचा जागीच मृत्यू झाला होता. पसार झालेल्या टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार तुकाराम झुंजार, चंद्रकांत रेजितवाड यांच्या पथकाने हडपसर – सासवड रोडवरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. या फुटेजद्वारे पोलिसांनी टँकरचा आर टी ओ नंबर मिळविला. त्याआधारे राजेंद्र तळेकर याला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगर तपास करीत आहेत.