Vice President Jagdeep Dhankhar | जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा तडकाफडकी राजीनामा; नवे उपराष्ट्रपती कोण होणार?

Jagdeep Dhankhar

नवी दिल्ली ः पोलीसनामा ऑनलाईन – Vice President Jagdeep Dhankhar | उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राजीनामा देताना धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार मानले.

त्यांच्या कार्यकाळाची मुदत ऑगस्ट २०२८ पर्यंत होती. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी राजीनामा सादर केल्याने चर्चांना उधाण आले आहे. पदावर असतानाच प्रकृतीच्या किंवा इतर कारणामुळे राजीनामा देऊ करणारे देशाचे पहिले उपराष्ट्रपती आहेत. धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारणार की नाही, हे लवकर स्पष्ट होणार आहे. तर धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, तर नवे उपराष्ट्रपती कोण होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. नुकतेच धनखड यांचे एम्समध्ये हृदयाचे ऑपरेशन झाले होते. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसभर किंवा त्याच्याही आधी देशभरात दौरे करताना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा अंदाज कोणालाही आला नव्हता. राज्यसभेत धनखड यांनी दोनदा भाषण देखील केले. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक देखील त्यांच्या दालनात झाली होती. मात्र त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने चर्चा रंगल्या आहेत.

नवे उपराष्ट्रपती कोण होणार?

महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तर तामिळनाडूचे राज्यपाल रवी किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाचा या पदासाठी विचार केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

You may have missed