Pune PMC News | समाविष्ट 16 गावांतील सांडपाणी व्यवस्थेच्या कामासाठी राज्य शासनाची 533 कोटी 85 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी

Pune PMC News | 16 corporators from 32 villages included in the Municipal Corporation! Corporators and political parties will have an opportunity to ensure balanced development of villages; Will 'villagers' get an opportunity in important positions?

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घोषणा !

पुणे : Pune PMC News | महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांपैकी १६ गावांतील सांडपाणी व्यवस्था आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी (एसटीपी) केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेअंतर्गत राज्य शासनाने ५३३ कोटी ८५ लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. उर्वरीत सात गावांसाठीचा ८५६ कोटी ९१ लाख रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार असून तांत्रिक मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे. यामुळे लवकरच पूर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांसोबतच २३ गावांतील सांडपाणी वाहीन्या आणि सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती मिळेल, असा विश्‍वास महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला आहे.

    महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांतील सांडपाणी वाहीन्या आणि एसटीपी प्रकल्पांसाठी प्रशासनाने दोन स्वंतत्र आराखडे तयार केले आहेत. या २३ गावांमधील जुन्या वाहीन्या बदलणे आणि नव्याने वाहीन्या टाकाव्या लागणार आहेत. सुमारे ४७१ किलोमीटरच्या जोडवाहीन्या आणि ९०. ५ कि.मी.च्या मुख्यवाहीन्या टाकण्यात येणार आहेत. तसेच सात गावांमध्ये ८ एसटीपी उभारण्यात येणार आहेत. या आठ एसटीपी प्लांटमध्ये २०१ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार असून या सर्व प्रकल्पासाठी १ हजार ४३७ कोटी ९४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

    या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेअंतर्गत निधी मागितला होता. मागील वर्षी ऑगस्टमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडे तांत्रिक मान्यतेसाठी प्रकल्प अहवाल सादर केला होता. यापैकी त्यापैकी १६ गावांतील सांडपाणी वाहीन्या आणि एसटीपी प्रकल्पासाठी ३४३ कोटी १३ लाख आणि  एसटीपीसाठी १९० कोटी ७२ लाख रुपये अशी ५३३ कोटी ८५ लाख रुपयांच्या निधीला महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने सोमवारी मंजुरी दिली. तर आज झालेल्या नगरविकास विभागाच्या तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये त्यावर अंतिम मोहोर उमटविण्यात आली. लवकरच यासंदर्भातील शासन आदेशही निघतील,  अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

या गावांमधील कामाला मिळाली मंजुरी

सूस, म्हाळुंगे, नर्‍हे, पिसोळी, सणसनगर, कोंंढवे धावडे, किरकिटवाडी, नांदोशी, खडकवासला, न्यू कोपरे, नांदेड, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी

या गावांतील प्रकल्प प्रशासकीय मान्यतेसाठी

बावधन, औताडेवाडी-हांडेवाडी, होळकरवाडी, वडाचीवाडी, वाघोली, शेवाळेवाडी, मांजरी बु. या सात गावांतील सांडपाणी वाहीन्या आणि एसटीपी प्रकल्पासाठी ८५६ कोटी ९१ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचा प्रस्तावही प्रशासकीय मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावा मान्यता मिळेल. या प्रकल्पाअंतर्गत ९५० कि.मी.च्या सांडपाणी वाहीन्या आणि ४ एसटीपी प्लांट उभारण्यात येणार आहेत. म्हाळुंगे, पिसोळी, नांदेड व गुजर निंबाळकरवाडी हे प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे.

मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या वाढदिनी गावकर्‍यांना गिफ्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. योगायोगाने त्यांच्या वाढदिवशीच नगरविकास विभागाने समाविष्ट गावांतील सांडपाणी यंत्रणेच्या कामासाठी ५३३ कोटी ९५ लाख रुपये निधी मंजूर करून एकप्रकारे या दोघांच्या वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. परंतू या औचित्याच्या मागे आगामी महापालिका निवडणुका हा देखिल महत्वाचा भाग असून नवीन गावांमध्ये महायुतीची ताकद दाखविण्याची संधी हा प्रमुख उद्देश असल्याची चर्चा आहे.

You may have missed