Pune Crime News | ज्या IPS अधिकार्‍याची ओळख सांगत होता, तेच पोलीस अधिकारी आले समोर, अन् तोतया IPS चे बिंग फुटले

New Project (1)

पुणे : Pune Crime News | पोलीस आयुक्तालयातील पार्किंगमध्ये पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांना त्याने त्याने पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले हे माझे बॅचमेट आहेत, अशी ओळख सांगितली. त्यांच्याशी बोलत असताना समोरुन पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले हे तेथे आले आणि या तोतया आयपीएस अधिकार्‍याचा भंडाफोड झाला.

सागर ज्ञानोबा वाघमोडे Sagar Gyanoba Waghmode (वय ३२, रा. नेरुळ, नवी मुंबई) असे या तोतया आयपीएस अधिकार्‍याचे नाव आहे. इव्हेंटची कामे मिळवून देतो, असे सांगून एका इव्हेंट मॅनेजमेंटची कामे करणार्‍याची अधिकार्‍यांशी भेट घडवून आणत होता.

याबाबत भाविक जितेंद्र शहा (वय ३७, रा. आशो पालफव्हिला, घोरपडी पेठ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पोलीस आयुक्तालयात ३१ ऑक्टोंबर रोजी दुपारी घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर वाघमोडे याची पत्नी मुंबई शहर पोलीस दलात अधिकारी आहे. भाविक शहा यांची सागर वाघमोडे याच्याशी गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ओळख आहे. तो आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले होते, तेव्हापासून तो शहा यांच्या संपर्कात आहे. ते दोघे विविध ठिकाणी भेटत असतो़. तेव्हा तो विविध विभागाचे कमिशनर, पोलीस अधीक्षक, वरिष्ठ अधिकारी हे त्याचे परिचयाचे असल्याचे सांगत असे. सागर वाघमोडे याने ३१ ऑक्टोबर रोजी भाविक शहा यांना फोन केला. ते स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे भेटले. त्यानंतर त्याने इन्कम टॅक्स कमिशनर, पोलीस उपायुक्त भाजीभाकरे, सहायक पोलीस आयुक्त संगिता आल्फान्सो माझ्या ओळखीचे आहेत. आपण त्यांना भेटु तुझ्या मनात काही क्युरी असतील तसेच काही कामे असतील तर ते पण होऊन जातील, तसेच तुला इव्हेटच्या संदर्भात काही कामे पण मिळतील, असे सांगितले. त्यानंतर ते दोघे स्वारगेट येथील इन्कम टॅक्स कार्यालयात जाऊन तेथील आयुक्त नितीन वाघमोडे यांना भेटले. त्यानंतर लष्कर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस आयुक्त संगिता आल्फासो यांची भेट घेतली. पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त दिवटे यांना भेटल्यानंतर ते पोलीस आयुक्त कार्यालय येथे आले. त्यांनी विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांची पार्किंगमध्ये भेट घेतली. त्यावेळी सागर वाघमोडे याने भाजीभाकरे यांना सांगितले की, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले हे माझे बॅचमेंट आहे. तेथे बोलत असताना तेथे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले हे आले़ भाजीभाकरे यांनी रावले यांना तुमचे बॅचमेंट असल्याचे सांगतात, असे सांगितले. त्यावेळी ऋषिकेश रावले म्हणाले की, सागर वाघमोडे याचे बाबत मला चांगली माहिती आहे, त्याच्यावर उत्तराखंडमधील हरीद्वार येथील कोतवाली पोलीस ठाण्यात बनावट आयपीएस अधिकारी असल्याबाबत गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी बोलावून सागर वाघमोडे याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

याबाबत पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सांगितले की, सागर वाघमोडे याच्याविषयी मी बातमी वाचली होती. त्याचा एकदा फोन आला होता, पण मी तो घेतला नाही. तोच हा सागर वाघमोडे असावा, असे वाटले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तालयात डॉ. भाजीभाकरे यांच्याशी तो बोलत असल्याचे पाहिल्यावर त्यांना काय सांगतोय, हे पाहू म्हणून मी तेथे गेलो. हा तोच सागर वाघमोडे आहे, ज्याच्यावर हरिद्वारमध्ये आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून गेस्ट हाऊस बुक केले म्हणून गुन्हा दाखल झाला होता.

You may have missed