Uddhav Thackeray | ‘..ही तर निवडणूक आयोगाची भुताटकी’; मतदार नोंदणीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर घणाघात

New Project (6)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Uddhav Thackeray | निवडणूक आयोगावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. एका घरात तब्बल ४० ते ५० नावे नोंदवली गेल्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, “ही निवडणूक आयोगाची भुताटकी आहे. फक्त माझे नाव वगळल्यावर चौकशी होते, पण सर्वसामान्य नागरिकांचे नाव गायब झाले तर दाद कोण देणार? असा सवाल करत त्यांनी आयोगाच्या कारभारावर थेट बोट ठेवले. “मतदार यादीतून नाव वगळले, तर त्या व्यक्तीला मतदान करता येणार नाही, असे ते म्हणाले.

पुढे ठाकरे म्हणाले की, आमच्या शाखेत येऊन मतदार यादी तपासा. परवा मत चोरीच्या मुद्द्यावरून एकत्र सर्वपक्षीयांचा मोर्चा झाला. त्यावेळी सर्वांनी सरकारला जाब विचारला. आता आम्ही मतदारांची ओळख केंद्र हे प्रत्येक शाखा शाखांमध्ये सुरू करणार आहोत. त्यानंतर पुढच्या आठवड्याभरात आक्षेप आणि काही सूचना या स्वीकारल्या जातील. आता जर कोणी झोपले, तर तो संपला. यांच्या मागे कोण काय, याची खातरजमा कोणी तरी करायला हवी.

आम्ही आमच्या शाखांमध्ये मतदारांची केंद्रे उघडतो आहोत. या केंद्रात नागरिकांनी यावे, त्यांनी त्यांची नाव आहेत की नाही, हे आमच्या शाखेत येऊन तपासावे. जर तुम्हाला यात काही गोंधळ वाटला तर लगेचच सांगा,’ असे आवाहन ठाकरे यांनी केले.

दरम्यान, मी मतदारांना आवाहन करतो की, आपल्याला न दिसणारी, आपल्या परवानगीशिवाय न राहणारी, आपल्या परवानगीने राहणारी माणसे आहेत का, ही निवडणूक आयोगाची उभी केलेली भुते आपल्या घरात राहत तर नाही ना, याची चौकशी केंद्रात करावी. सर्व जात, धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन मतदार यादीची चौकशी करावी. तुमचे नाव वगळले का, वय किती आहे, लिंग बदलले का, धर्म बदलला का, हे सर्व येऊन तपासावे.

You may have missed