Pune Crime News | गणेशोत्सवात दागिने चोरणारा चोरटा दोन महिन्यांनी जेरबंद; 7 गुन्हे उघडकीस, 7 लाखांचा ऐवज जप्त, विश्रामबाग पोलिसांची कामगिरी

New Project (11)

पुणे : Pune Crime News | गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेऊन लोकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरुन नेणार्‍या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन शोध घेऊन त्याला जेरबंद केले. त्याच्याकडून ७ गुन्ह्यातील ७ लाख ११ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

परशा ऊर्फ प्रशांत शिवराम शिंदे Parsha Alias Prashant Shivram Shinde (वय २२, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, खुळेवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेऊन अनेक भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. ६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकरा या वेळेत लक्ष्मी रोडवरील बेलबाग चौकात फुटपाथवर गणपती बघायला उभे असताना त्यांच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे साखळीचे ओवलेले रुद्राक्ष चोरुन नेले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना विश्रामबाग पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यावरुन पोलिसांनी संशयिताची माहिती सर्वत्र दिली होती. पोलीस अंमलदार अमोल भोसले यांना बातमीदाराकडून खबर मिळाली की, हा संशयित खुळेवाडी येथे रहातो. त्यावरुन सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर व पोलीस अंमलदारांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबुल केला. तपासादरम्यान त्याच्याकडून ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याचे घराजवळ राहणार्‍या एकाला त्याने हे दागिने देऊन त्याच्याकडून पैसे घेतले होते. पोलिसांनी त्यालाही आरोपी करुन त्याच्याकडून ७ गुन्ह्यातील ७० ग्रॅम वजनाचे ७ लाख ११ हजार रुपयांचे वेगवेगळे दागिने जप्त केले आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे, अमोल भोसले, आशिष खरात, सागर मोरे, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, अर्जुन थोरात, नितीन बाबर, राहुल माळी, पठारे यांनी केली आहे.

You may have missed