Pune Crime News | तरुणावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करणाºया तिघा गुन्हेगारांना आंबेगाव पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे : Pune Crime News | पुणे बंगलोर महामार्गावरील आंबेगाव येथील सीसीडी कॅफे येथे थांबलेल्या तरुणाच्या कारला दुचाकीची धडक देऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करणार्या तिघांना आंबेगाव पोलिसांनी पकडले आहे.
मृणाल दीपक जाधव Mrunal Deepak Jadhav (वय २०, रा. कात्रज) याला अटक केली आहे. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अक्षय दत्तात्रय बांदल (वय २६, रा. विश्व हाईटस, सिद्धी विनायक सोसायटी, आंबेगाव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अक्षय बांदल हे त्यांचा भाऊ आकाश बांदल, ओंकार बांदल, मित्र सार्थक वाल्हेकर, अमन भाटिया यांच्याबरोबर २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सीसीडी कॅफे येथे कारने कॉफी पिण्यासाठी गेले. कॉफी पिऊन झाल्यावर बाहेर येऊन कारच्या पाठीमागे गप्पा मारत उभे होते. त्यावेळी कारचे पुढील बोनेटला एका मोपेडने कारच्या बोनेटला धडक दिली होती. मोपेडवरील तिघे जण खाली पडले. यावेळी एका अल्पवयीन मुलाने कमरेचा कोयता काढून याला आज जिवंत सोडायचे नाही, असे म्हणत अक्षय यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर मृणाल जाधव याने त्याच्याकडील कोयत्याने अक्षय बांदल यांच्या डाव्या हाताचे पंजावर वार केला.दुसर्या मुलाने त्याच्याकडील कोयत्याने उजव्या हाताचे मनगटावर, पाठीवर व डाव्या पायाचे पजावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना वाचविण्यासाठी मित्र पुढे झाल्यावर या तिघांनी हवेत कोयते फिरवून ‘‘आम्ही इथले भाई आहोत़ कुणी आमचे नादी लागू नका’’असे बोलून दहशत पसरवित ते पळून गेले. अक्षय बांदल याला भाऊ व मित्रांनी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन तिघांना पकडले. मृणाल जाधव याला अटक केली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी, पोलीस अंमलदार विशाल मगदुम, भिवा वाघमारे, राहुल मोहिते यांनी केली आहे.
