Pune Traffic Updtaes | स्वारगेट येथील जेधे चौकातील भुयारी मार्ग शुक्रवार रात्रीपासून तीन दिवस बंद; दुरुस्तीच्या कामासाठी ठेवणार बंद

New Project (15)

पुणे : Pune Traffic Updtaes | स्वारगेट येथील जेधे चौकात सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग शुक्रवारी रात्री ११ वाजल्यापासून वाहतूकीस बंद करण्यात येत आहे. ही दुरुस्ती १० नोव्हेंबरपर्यंत सकाळी ७ वाजेपर्यंत चालणार असून तोपर्यंत वाहनांना हा मार्ग बंद राहणार आहे.

शंकरशेठ रोडवरुन सारसबागेकडे जाणार्‍यासाठी केशवराव जेधे चौकात भुसारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या भुयारी मार्गामध्ये कडेच्या भिंतींमधून पाणी पडत आहे. त्यामुळे मार्गामध्ये पाणी साचत असल्याने वाहनांसाठी ते धोकादायक आहे. तसेच बाजूचे पाणी जाण्याचे चॅनेलची दुरुस्ती करण्याचे काम बाकी आहे. काही दिवसांपूर्वी हे काम करण्यात येणार होते. परंतु, पावसामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे पुढील चार दिवसात हे काम हाती घेण्यात येणार आहे.

शंकरशेठ रोडवरुन येणार्‍या वाहनांनी भुयारी मार्गाने न जाता डावीकडील रस्त्याने जेधे चौकात येऊन चौकातून सारसबागेकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.

You may have missed