Pune Crime News | व्यावसायिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणार्‍या व्हाईट कॉलर गुन्हेगाराला खडक पोलिसांनी कोलकत्यामधून केले अटक

Bhupendra Singh Alias Sanjay Kripal Singh Raghav (1)

पुणे : Pune Crime News | दुबई आणि टांझानिया देशातून कमी दरात कच्चा माल (स्क्रप मटेरियल) देशात आयात करण्याच्या बहाण्याने भांडे व्यावसायिकाला ३ कोटी ८० लाख रुपयांचा गंडा घालणार्‍या व्हाईट कॉलर सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी कोलकत्यावरुन जेरबंद केले आहे.

भुपेंद्रसिंग ऊर्फ संजय कुमार राघव Bhupendra Singh Alias Sanjay Kripal Singh Raghav (रा. ग्रेटर नोएडा, कसना, उत्तर प्रदेश, सध्या रा़ मालाड, मुंबई) असे अटक केलेल्या या गुन्हेगाराचे नाव आहे.

याबाबत सुधीर रघुनाथ बारोट (रा. रविवार पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भुपेंद्र सिंग उर्फ संजय कुमार राघव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास केला होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधीर बारोट यांना त्यांच्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची गरज होती. त्यांची डिसेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान मुंबईतील इंडो अफी मेटल्स को. एलएलसी व सबपर्ला इंटरनॅशनल एलएलपीचे मालक भुपेंद्र सिंग उर्फ संजय कुमार राघव व त्यांचा मुलगा प्रन्वीरसिंग संजय कुमार राघव यांच्याशी ओळख झाली. या कंपन्यांनी दुबई व टांझानियातील कारखाने असल्याचा दावा करून बारोट यांना कच्चा माल पुरवण्याची हमी दिली.

बारोट यांना दुबईला बोलावून पुढे टांझानिया येथे नेऊन ७५ टन स्क्रॅप मटेरियल दाखवून तो गुजरात येथील मुंद्रा पोर्ट येथे आयात करण्याचा करार करून विश्वास संपादन केला. बारोट यांनी आरोपींच्या अबुधाबी बँकेतील खात्यावर ३ कोटी ७९ लाख ७७ हजार ३७५ रुपये जमा केली. परंतु, त्यानंतर कोणताही कच्चा माल दिला नाही किंवा रक्कम परत मिळाली नाही.

या दोघा पिता पुत्रांनी पर्वती दर्शन येथील व्यावसायिक मिलिंद रवींद्र नाशिककर यांची अशाच प्रकारे ९० लाख रुपयांची फसवणुक केली होती. यातील गुन्हेगार भुपेंद्रसिंग हा कोलकत्ता येथे जाणार असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथक कोलकत्ता येथे गेले. त्यांनी भुपेंद्रसिंग याला २० नोव्हेबर रोजी अटक करुन पुण्यात आणले़ त्याला न्यायालयाने २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या पितापुत्रांनी भारतातील कोलकत्ता, केरळ, उडीसा, पंजाब, उत्तर प्रदेश व इतर राज्यांमध्ये अशाच पद्धतीने कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत असल्याचे दिसून आले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, मनोजकुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक भारत बोराडे, सहायक पोलीस फौजदार संतोष मोहिते, पोलीस हवालदार राजाराम गाडवे, किरण खुडे, किरण घुटे, पोलीस अंमलदार संतोष साबळे यांनी केली आहे़

You may have missed