Pune Crime News | मालकाच्या बोर्डाची मोडतोड करुन स्वत:चा बोर्ड लावून जमीन बळकाविण्याचा प्रयत्न, हेमंत बुद्धिवंतसह दोघांवर गुन्हा दाखल

FIR

पुणे : Pune Crime News | पिसोळी गावातील जागा मालकाच्या बोर्डाची मोडतोड करुन तारेचे कंपाऊंड काढून त्याजागी स्वत:चा बोर्ड लावून जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत प्रविण प्रतापराव जगताप (वय ५५, रा. कुमार पार्क सोसायटी, बिबवेवाडी) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हेमंत तुकाराम बुद्धिवंत Hemant Tukaram Buddhiwant (रा. एनआयबीएम रोड, उंड्री) व करुणा अ‍ॅन्थोनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पिसोळी गावामध्ये २५मे ते २६ नोव्हेबर २०२५ दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण जगताप यांनी पिसोळी गावातील ४० गुंठे जागा २०२१ मध्ये खरेदी केली होती. या जागेची मोजणी करुन घेतली होती. त्यांच्या जमिनीभोवती तारेचे कंपाऊंड टाकून जागा बंदित केली होती. त्यांचा बोर्ड जगताप यांनी लावला होता. हेमंत बुद्धिवंत याने जगताप यांच्या बोर्डाची मोडतोड करुन त्यांनी लावलेले सिमेंटचे पोल, तारेच्या कंपाऊंडसह काढून टाकून १ लाख रुपयाचे नुकसान केले. त्या जागेवर स्वत:चे मालकी हक्काची जमीन असा बोर्ड लावून अतिक्रमण करुन जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला. प्रविण जगताप यांना हे समजल्यावर ते जागेवर गेले. तेव्हा हेमंत बुद्धिवंत याने त्यांना शिवीगाळ करुन पुन्हा त्या जागेवर आले तर बघुन घेण्याची व अ‍ॅट्रोसिटी टाकण्याची धमकी दिली.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार यांनी सांगितले की, प्रविण जगताप यांनी ही जागा घेतली असून त्या जागेची मोजणी करुन घेतली आहे. त्याबाबतची कागदपत्रे दाखविली आहे. हेमंत बुद्धिवंत यांना दोन बोलावले होते, परंतु ते आले नाहीत. त्यामुळे उपलब्ध कागदपत्रांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

You may have missed