Pune Crime News | दोघा शाळकरी बहिणीवर अत्याचार करणार्या नराधमास अटक; मम्मीसह मुलींना मारण्याची देत होता धमकी, विमानतळ पोलिसांनी दाखविला इंगा
पुणे : Pune Crime News | अल्पवयीन दोघा शाळकरी बहिणींना मम्मीसह मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानतळ पोलिसांनी या नराधमास अटक केली आहे.
याबाबत पिडित मुलींच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन भेकराईनगर येथे राहणार्या ३२ वर्षाच्या जीम ट्रेनरला अटक केली आहे़ हा प्रकार २०१७ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पहिल्या पतीपासून १५ व १४ वर्षाच्या मुली आहे. पतीबरोबर न पटल्याने त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळे राहू लागले. त्यांना दोन मुली आहेत. त्यानंतर फिर्यादी या दोन मुलीसह आरोपीबरोबर राहु लागल्या. फिर्यादी कामावर बाहेर गेल्या की आरोपी मुलींना कामे सांगायचा, मालिश करुन देण्याच्या बहाण्याने तो मुलींशाी अश्लिल कृत्य करत. त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत. ही गोष्ट आईला सांगितली तर तुम्हाला व तुमच्या मम्मीला मारुन टाकेन. तुमच्या पहिल्या वडिलांकडे सोडेन, अशी धमकी देत होता. घाबरलेल्या मुलींनी ही बाब आईला सांगितल्यानंतर त्यांनी तीन महिन्यापूर्वी याला घरातून बाहेर काढले. त्यानंतर आता विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सपना देवताळे तपास करीत आहेत.
