Pune Crime News | युगांडाच्या महिलेकडून स्पाच्या नावाखाली केला जात होता वेश्या व्यवसाय; मुंढवा पोलिसांनी युगांडाच्या महिलेला केली अटक, 4 पिडित महिलांची सुटका
पुणे : Pune Crime News | मसाज स्पाच्या नावाखाली परदेशी तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवुन घेण्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. पूर्व आफ्रिकेतील युगांडा येथून पुण्यात आलेल्या महिलेने आपल्या देशातील महिलेकडून वेश्या व्यवसाय करवुन घेताना मिळून आल्या. मुंढवा पोलिसांनी या महिलेला अटक केली असून युगांडाच्या पिडित चार महिलांची सुटका केली आहे.
सारा फिओना नागोबी (वय २७, रा. युगांडा, सध्या रा. दळवी हाईटस, मुंढवा गावठाण) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार विनोद साळुंके यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडा देशातील महिला ऑनलाईनवर मसाज सेंटरच्या नावाखाली फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांच्या बनावट ग्राहकाने त्यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधला. मुंढवा गावठाणातील दळवी हाईटस येथे २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता पोलिसांनी छापा टाकला. तेथे युगांडातील ही महिला अन्य चार युगांडातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करुन वेश्या व्यवसाय करवुन घेत असल्याचे दिसून आले. आरोपी महिला ही काही दिवसांपूर्वीच पुण्यात आल्याचे तिच्या कागदपत्रावरुन दिसून येते. युगांडातील पिडित ४ महिलांपैकी काही जणींच्या व्हिसाची मुदतही संपलेली दिसून आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासनिक तपास करीत आहेत.
