Pune Crime News | आईच्या उपचारासाठी दिलेले पैसे परत मागितल्याने तरुणावर चौघांनी वार करुन केले गंभीर जखमी
पुणे : Pune Crime News | आई आजारी असल्याने तरुणाने उपचारासाठी ३५ हजार रुपये दिले होते. त्यातून त्याने आईवर उपचार केले. आता त्याने हे पैसे परत मागितल्यावर त्याने मित्रांच्या मदतीने तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हत्याराने वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
संस्कार संजय जाधव (वय २१, रा. अभयुदय सोसायटी, वानवडी) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सोहम सुमित शिंदे Soham Sumit Shinde (रा. वानवडी), बाब्या, चिक्या, उदय अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महमंदवाडी येथील अवनी सोसायटीजवळ, ५ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, संस्कार जाधव याने सोहम शिंदे यास त्याचे आईच्या उपचाराकामी ३५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर संस्कार जाधव याने उसने घेतलेले पैसे परत मागितले. तेव्हा सोहम शिंदे याने टाळाटाळ केली. ५ डिसेंबर रोजी रात्री अवनी सोसायटीजवळ संस्कार जाधव याला सोहम शिंदे दिसला. त्यांनी सोहमकडे पैसे मागितले. या कारणावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा सोहम शिंदे व त्याच्याबरोबरील इतर तिघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याजवळील हत्याराने संस्कार जाधव याच्यावर वार करुन गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक अब्दागिरे तपास करीत आहेत.
