Pune Crime News | बँकॉकवरुन आलेल्या प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने 2 कोटी 29 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा केला जप्त

Pune Crime News | Customs department seizes hydroponic marijuana worth Rs 2.29 crore from passenger arriving from Bangkok

पुणे : Pune Crime News | देशभरात इंडिगोची उड्डाणे रद्द झाल्याने खळबळ उडाल्यानंतर बँकॉकहून आलेल्या इंडिगोच्या विमानातील प्रवाशाला सीमा शुल्क विभागाच्या पथकाने हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणार्‍या प्रवाशाला पकडले. त्याच्याकडून २ कोटी २९ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

विमानतळावर ८ डिसेंबर रोजी बँकॉकहून आलेल्या विमानातून एक प्रवासी उतरला. तो घाईघाईत विमानतळावरून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. कस्टमच्या पथकातील अधिकार्‍यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याच्या बॅगेत हायड्रोपोनिक गांजा सापडला. त्याच्याकडून २ कोटी २९ लाख रुपयांचा २ हजार २९९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. हायड्रोपोनिक गांजाची लागवड नियंत्रित वातावरणात केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात नियंत्रित वातावरणात लागवड करण्यात आलेल्या हायड्रोपोनिक गांजाची किंमत मोठी असते.

You may have missed