Pune Crime News | पियानो क्लासमध्ये शाळकरी मुलाशी अश्लिल कृत्य; विमानतळ पोलिसांनी सफाई कर्मचार्‍यावर केला गुन्हा दाखल

Pune Crime News | Obscene act with schoolboy in piano class; Airport police files case against cleaning staff

पुणे : Pune Crime News |  पियानो वादनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाशी अश्लिल कृत्य करुन शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पियानो अ‍ॅकडमीमध्ये सफाई काम करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अनिल बापरुकवाड (वय २६, रा. नांदेड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.

याबाबत मुलाच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलगा हा विमाननगरमधील पियानो अ‍ॅकडेमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी जात होता. ८ डिसेंबर रोजी क्लास नव्हता. हा मुलगा प्रॅक्टिस करण्यासाठी गेला होता. यावेळी तेथे सफाई काम करणार्‍या अनिल याने या मुलाशी अश्लिल कृत्य केले. त्याची लैंगिक सतावणूक करुन गैरवर्तन केले. घाबरलेल्या मुलाने याबाबतची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक करपे तपास करीत आहेत.

You may have missed