PI Sandeep Bhosale Passes Away | वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन

PI Sandeep Bhosale Passes Away | Senior Police Inspector Sandeep Bhosale passes away

पुणे : PI Sandeep Bhosale Passes Away |  गेली काही वर्षे दुर्धर आजाराशी सामना करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (वय ५५) यांचे निधन झाले. संदीप भोसले हे कर्करोगाने आजारी होते. या रोगाशी लढताना गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर हडपसर येथील अमरधाम स्मशानभूमीत सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संदीप भोसले यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तसेच गुन्हे शाखेत कार्य केले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना २०२२ -२३ मध्ये अनेक गुन्हे उघडकीस आणले होते. कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हे निरीक्षक म्हणून काम पाहिले होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी गृह जिल्हा असल्याने त्यांची औरंगाबाद येथे बदली करण्यात आली होती. निवडणुकांनंतर आजारपणाच्या कारणावरुन त्यांची पुन्हा पुण्यात गुन्हे शाखेत बदली करण्यात आली होती. गेले काही महिने  संदीप भोसले हे  आजाराशी सामना करत होते. त्यांच्या मागे पत्नी व २ मुले असा परिवार आहे.

You may have missed